BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : अज्ञात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0 372
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या बसने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि १४) पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे घडली.

सेजल कालीपाडा रॉय (वय 50, रा. चाकण) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सेजल पुणे-नाशिक महामार्गावरून नाणेकरवाडी येथे रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या एसटी बसने सेजल यांना धडक दिली.

यामध्ये सेजल यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात बसचालक घटनास्थळी न थांबता घटनेची माहिती न देता पळून गेला. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3