Chakan : ओव्हरटेक करताना ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  ओव्हरटेक करत असताना ट्रकची एका दुचाकीला धडक बसल्यामुळे  दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 15) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रोडवर मोहितेवाडी (Chakan) येथे घडली.

नवसाद अहमद कमरुद्दीन अन्सारी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद अरफीन अन्सारी (वय 18, रा. मुंबई) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक हसनखान सुभान खान पठाण (वय 31, रा. मादनी डोणगाव, ता. मेहकर) याला (Chakan) पोलिसांनी अटक केली आहे.

 

Ravet : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस अंमलदाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी आणि त्यांचे मामा नौसाद हे दुचाकीवरून चाकण शिक्रापूर रोडने जात होते. मोहितेवाडी येथे आल्यानंतर आरोपी पठाण याने त्याच्या ताब्यातील ट्रकने अन्सारी यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ट्रकची दुचाकीला धडक बसली. यामध्ये नौसाद यांचा मृत्यू झाला तर फिर्यादी अन्सारी हे जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.