Chakan: ट्रकचा राँग टर्न; सिग्नलचा खांब पाडून ट्रेलरला धडक

Chakan: truck turn; Hit the trailer by knocking down the signal pole नाशिक बाजूकडून आरोपीचा ट्रक आला. भरधाव आलेल्या ट्रकने चौकातील सिग्नलचा खांब तोडून तळेगाव बाजूकडून आलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली.

एमपीसी न्यूज- सिग्नलवर थांबलेल्या ट्रेलरला भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रेलरला धडकण्यापूर्वी ट्रकने सिग्नलचा खांब देखील पाडला. हा राँगटर्नचा प्रकार मंगळवारी (दि.30) दुपारी अडीच वाजणाच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे घडला.

जितेंद्र कुमार राधेशाम सिंग (वय 38, रा. खात्रसरोड फाउंडीनगर, ता. एदमादपूर, जि. आगरा, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी चाकण वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी कल्पेश विठ्ठल खर्डे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी दुपारी चाकण येथील तळेगाव चौकात ड्युटीवर होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तळेगाव बाजूकडून एक ट्रेलर आला. तो सिग्नलवर थांबला.

त्यावेळी नाशिक बाजूकडून आरोपीचा ट्रक आला. भरधाव आलेल्या ट्रकने चौकातील सिग्नलचा खांब तोडून तळेगाव बाजूकडून आलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली.

अचानक घडलेल्या या राँगटर्न बाबत परिसरातील नागरिक अचंबित झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like