Chakan : दरोड्याच्या  गुन्ह्यातील दोन आरोपींना खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

Two accused in robbery case arrested by anti-ransom robbery squad

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या   गुन्ह्यातील दोन आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने मोशी येथून अटक केली.

संकेत बाजीराव लेंडघर (वय 21),  सुधाकर दत्तात्रय जंबुकर (वय 27, दोघे रा. रानुबाई मळा, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथक पोलीस चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याचा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस नाईक उमेश पुलगम यांना माहिती मिळाली की, चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याचा गुन्ह्यातील आरोपी संकेत आणि सुधाकर देहूफाटा मोशी येथे थांबलेले आहेत.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. दोघांना अटक करून पुढील कारवाईसाठी आरोपींना चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी सुधाकर हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी महेश खांडे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, गणेश कोकणे यांच्या पथकाने ही कामगिरी  केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.