Chakan : इलेक्ट्रिक शॉक लागल्याने दोन म्हशींचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वीज चोरी करून शेतात अस्ताव्यस्त टाकलेल्या वायरचा शेतात चारा खात असताना दोन म्हशींना शॉक लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 29 मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान खेड तालुक्यात वाघु गावात घडली.

पोलीस हवालदार अनिल हरिभाऊ ढेकणे यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिवराम रघु साबळे (रा. वाघु, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम रघु साबळे यांची भामा आसखेड प्रकल्पात जमीन आहे. त्यांच्या जमिनीत असलेल्या इलेक्ट्रिक पोलवर त्यांनी वीज चोरी करण्याच्या उद्देशाने आकडा टाकून वीज घेतली. वीज चोरी करताना इलेक्ट्रिक वायर शेतामध्ये इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे टाकली. कान्हेवाडी येथील तुकाराम खंडू प्रधान यांच्या दोन म्हशी साबळे यांच्या शेतात चारा खात होत्या. अस्ताव्यस्त पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा म्हशींना शॉक लागला. यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.