BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : दुचाकी घसरून दोघांचा मृत्यू; चाकण-शिक्रापूर रोडवरील कडाचीवाडी येथील घटना

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – दुचाकी स्लिप होऊन पडल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना 6 जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवरील कडाचीवाडी येथे घडली.

ज्ञानेश्वर शंकर ठोंबरे (वय 19, रा. बर्गे वस्ती, ता. खेड. मूळ रा. दाभा, ता. लोणार, जि. बुलढाणा), गणेश काशिनाथ चाटे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर आणि गणेश दुचाकीवरून (एमएच 14 / एचएन 3149) चाकण शिक्रापूर रोड वरून जात होते. ते कडाचीवाडी गावाच्या हद्दीत आले असता त्यांची दुचाकी स्लीप झाली. यामध्ये ज्ञानेश्वर आणि गणेश दोघेही गंभीर जखमी झाले. त्यातच दोघांचा मृत्यू झाला. याबाबत दुचाकी चालक ज्ञानेश्वर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
HB_POST_END_FTR-A2

.