Chakan : कंपनीच्या वेअर हाऊसमधून दोन लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज : कंपनी बंद असताना (Chakan) कंपनीच्या वेअर हाऊसमधून दोन लॅपटॉप चोरून नेले. हि चोरी 2 जून ते 6 जून दरम्यान चाकण येथील पलोमीक ग्लोबल लिमिटेड येथे घडली.

याप्रकरणी संदिप शिवाजी मोरे (वय 34 रा. रासे , खेड) यांनी बुधवारी (दि.7) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोराविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी बंद असताना (Chakan) चोरट्याने कंपनीच्या वेअर हाऊसचा पाठी मागचा पत्रा कापून आत प्रवेश केला व तेथून 25 हजार रुपयांचे दोन लॅपटॉप चोरून नेले आहेत. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Moshi : अल्पवयीन मुलीसोबत लिफ्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.