Chakan : टेम्पो ट्रॅव्हलरमधून 17 कामगारांना नेणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – टेम्पो ट्रॅव्हलरमधून 17 कामगारांना घेऊन जाणाऱ्या दोघांवर सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत तसेच टेम्पो ट्रॅव्हलरमधून घेऊन जाणाऱ्या कामगारांमध्ये सामाजिक अंतर न ठेवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 18) रात्री सातच्या सुमारास म्हाळुंगे गावच्या हद्दीत एचपी चौक, चाकण येथे केली.

किसन पांडुरंग करदोरे (वय 36, रा. निगडी), रोहित श्रीधर साबळे (वय 35, रा. पंचतारा नगर, आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई सुनील नागरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सातच्या सुमारास आरोपींनी एम एच 46 / के 0147 या टेम्पो ट्रॅव्हलर गाडी मधून 17 कामगारांना बसवून नेले. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. शासनाने दिलेल्या संचारबंदी आणि जमावबंदी आदेशाचे आरोपींनी पालन केले नाही.

तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सुचविलेल्या सामाजिक अंतराचे देखील त्यांनी पालन केले नाही. याबाबत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.