Chakan: चाकण, सांगवीमधून दोन वाहने चोरीला

Chakan: Two vehicles stolen from Chakan, Sangvi अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 23 जून रोजी सकाळी उघडकीस आला.

एमपीसी न्यूज- चाकण येथून 20 हजारांची एक दुचाकी चोरीला गेली आहे. तर सांगवी परिसरातून 50 हजार रुपये किमतीचा तीनचाकी टेम्पो चोरट्यांनी पळवून नेला आहे. या दोन्ही घटनांबाबत शनिवारी (दि. 27) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नितीन बिहारी जैस्वाल (वय 34, रा. विनायक पार्क, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 एफक्यू 4138) 22 जून रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 23 जून रोजी सकाळी उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

गोविंदराज आशप्पा कामटे (वय 31, रा. चिंचवड स्टेशन, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामटे यांच्याकडे तीनचाकी टेम्पो (एमएच 14 जीसी 8906) आहे.

21 जून रोजी त्यांनी त्यांचा टेम्पो पिंपळे गुरव येथील गोरा कुंभार रोडवर रात्री पावणे आठच्या सुमारास पार्क केला. अज्ञात चोरट्यांनी टेम्पोचे लॉक तोडून 50 हजार रुपये किमतीचा टेम्पो चोरून नेला. ही घटना 22 जून रोजी सकाळी उघडकीस आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.