Chakan : रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; मयत दुचाकीस्वारावरच गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी आदळली. यामध्ये दुचाकी रस्त्यावर पडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना 29 जुलै रोजी रात्री निघोजे येथे घडली.

विनायक काशिनाथ गवळी (वय 39, रा. आळंदी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक 27 जुलै रोजी रात्री साडेसातच्या सुमारास निघोजे ते स्पायसर या मार्गावर दुचाकीवरून (एमएच 12 / ईव्ही 3184) जात होते. ते निघोजे येथे एआरएआय कंपनीजवळ आले असता त्यांची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात आदळली. यामुळे विनायक मोटारसायकलसह रस्त्यावर पडले.

यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी विनायक यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.