Chakan : भरधाव वेगात जाणाऱ्या खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या एका खासगी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर चाकण सिग्नलजवळ घडली.

संतोष रामकृष्ण महाळुंगकर (वय 40, रा. म्हाळुंगे, ता खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दामोदर बुदन महातो (वय 35, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोपट रामकृष्ण महाळुंकर (वय 42) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दामोदर हा बसचालक आहे. 5 मे रोजी रात्री पावणे आठ वाजता दामोदर त्याची बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 7236) घेऊन नाशिक-पुणे महामार्गावरून जात होता.

चाकण येथील सिग्नलवर खराबवाडी कडून चाकणकडे येत असलेल्या पोपट महाळुंकर यांच्या दुचाकीला (एच एच 14 / जी आर 0862) दामोदर याच्या बसने जोरदार धडक दिली. यात पोपट महाळुंकर हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.