Chakan: ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Chakan: Two-wheeler rider killed after being crushed under truck

एमपीसी न्यूज- दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार खाली पडून त्याच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.6) सकाळी आठ वाजता चाकण-शिक्रापूर रोडवर भासे गावाजवळ घडली.

प्रवीण नाथसाहेब गाडे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अजित अनिल डफळ (वय 24, रा. गवंडी वस्ती, धामारी, ता. शिरूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी ट्रक चालक शशिकुमार बाबुराव मुळे (वय 46, रा. देहूगाव, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मृत प्रवीण गाडे हे दुचाकीवरुन (एमएच 14 एफएन 3773) शिक्रापूरकडून चाकणकडे जात होते.

भासे गावाजवळ हिंदुस्थान बायोडिझेल पेट्रोल पंपाजवळ आले असता आरोपी शशिकुमार याच्या ट्रकने गाडे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

या धडकेत गाडे रस्त्यावर पडले. त्यानंतर गाडे यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले आणि त्यात ते चिरडले गेले. त्यातच गाडे यांचा मृत्यू झाला. गाडे यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like