Chakan : आईचे आधारकार्ड शोधून न दिल्याने पत्नीला लोखंडी बत्त्याने मारहाण

एमपीसी न्यूज – आईचे आधारकार्ड शोधून देण्यासाठी पत्नीला सांगितले. ते पत्नीने शोधून न दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला खोल बत्त्यातील लोखंडी बत्त्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 29) सकाळी साडेदहा वाजता मेदनकरवाडी येथे घडली.

सुषमा बाळासाहेब सोनवणे (वय 40, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) असे जखमी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाळासाहेब रावजी सोनवणे (वय 45) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पती-पत्नी आहेत. आरोपी रविवारी सकाळी घरामध्ये ऑनलाईन किसान योजनेचा फॉर्म भरत होता. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या सासूचे आधारकार्ड शोधण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आधारकार्ड शोधून न दिल्याने आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी करून लोखंडी बत्त्याने मारहाण करून दुखापत केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.