Chakan : चाकण परिसराला अवकाळी पावसाने झोडपले; भाजीपाला आणि कांदा उत्पादकांचे नुकसान

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून शरीराची लाही लाही करणारी उष्णता असताना शुक्रवारी दि. (10 मे) रोजी आणि शनिवारी दि. )11 मे) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मात्र अचानक आकाशात ढग दाटून आले होते. शुक्रवारी चाकण परिसराला पावसाने हुलकावणी दिली. मात्र शनिवारी चाकणसह आजूबाजूच्या परिसरात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली(Chakan) आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, शनिवारी(11 मे) रोजी अवकाळी पाऊस सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत चाकण परिसरात पडला.   मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून पुन्हा एकदा शेतकर्‍यांसमोर नवे अस्मानी संकट उभे राहिले आहे.

चाकण शहरात सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री उशिरापर्यंत या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पहिल्याच पावसाने खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे महावितरणच्या मर्यादा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणल्या आहेत.अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी कांदा आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले (Chakan) आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर चाकण परिसरातील बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी,अशी माफक अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत असल्याचे समजते.

Alandi : आळंदीमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.