Chakan News : खेड तालुक्यात वंचितची मोर्चे बांधणी, जिल्हाध्यक्ष राज कुमार यांचा खेड दौरा

एमपीसी न्यूज :  जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यादृष्टीने काही राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर (Chakan News) ठेऊन वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरु केली असल्याचे ठिकठिकाणी सुरु असलेल्या कार्यकर्ता मेळाव्यातून स्पष्ट होत आहे. खेड तालुक्यात संघटन वाढीसाठी वंचितकडून बीज पेरणी करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राज कुमार यांच्या खेड  तालुक्यातील दौऱ्यामुळे आंबेडकरी चळवळीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जबाबदारी द्या…  खेड तालुक्यात आंबेडकरी जनता वंचित मध्ये मोठ्या प्रमाणावर आकृष्ट करू अशी हमी गावागातील कार्यकर्ते देऊ लागले आहेत.  चाकण ( ता. खेड ) येथील आंबेडकर उद्यानात वंचित बहुजन आघाडीची मंगळवारी (दि. 20) बैठक झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकार्यांच्या मुलाखती खुद्द जिल्हाध्यक्ष राज कुमार यांनी घेतल्या.

Pune News : पुण्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

यावेळी खेड तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.  यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. (Chakan News) खेड तालुक्यासह जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर संघटन सुरु असल्याचे जिल्हाध्यक्ष राज कुमार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.