Chakan : पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण करत कारची तोडफोड

एमपीसी न्यूज : पैसे दिले नाहित म्हणून दोघांनी तरुणाला (Chakan) लोखंडी टॉमीने मारहाण करत शिवीगाळ करत कारची तोडफोड केली आहे. हि घटना 3 मे रोजी चाकण येथे घडली आहे.

याप्रकरणी धनंजय सुरेश पानसरे (वय 27 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. यावरून प्रतिक शहाजी जाधव (वय 20 रा. खेड), चंदु बिराजे हाजारे (वय 21 रा. खेड) यांना चाकण पोलिसांनी अटक केली असून ओकांर कुल्हाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : विसंगतीतून विनोद निर्मिती – श्रीकांत चौगुले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्राला त्याच्या गाडीची चावी देत असताना आरोपी तेथे आले. त्यावेळी फिर्यादीला 1 लाख रुपये मागितले फिर्यादीने त्याला नकार दिला असता. आरोपींनी त्यांच्याकडील लोखंडी टॉमीने फिर्यादिला मारहाण करत शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली.0

फिर्यादीचा गळा दाबून त्यांना धमकी दिली की, तुझ्याकडे पैसा असून (Chakanतू देत नाही, तुला व तुझ्या घरच्यांना तसेच तुला मदत करणाऱ्यांना बघून घेऊ म्हणत फिर्यादीच्या मित्राच्या गाडीच्या काचा आरोपींनी फोडल्या. यावरून चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.