Chakan : वाहन चोरीचा सपाटा सुरुच, सहा वाहनचोरीच्या गुन्ह्यांची नोंद; नगरपालिकेच्या पार्किंगमधून मोटरसायकल पळवली

एमपीसी न्यूज – शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असून आणखी सहा वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. चाकण चौक येथे नगरपालिकेच्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी पाचच्या सुमारास घडली.

सोमनाथ नामदेव कोरडे (वय 48, रा. चिंचवडेनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ यांनी त्यांची मोटरसायकल (एमएच 14 /यू 8060) चाकण चौक येथे नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने मोटरसायकलचे हँडल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आळंदी पोलीस तपास करीत आहे.

पिंपरी येथे सेवा विकास बँकेसमोर पार्क केलेल्या दोन कार देखील चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. 24) पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी चंदनकुमार चंद्रशेखर प्रसाद सिंह (वय 27, रा. पिंपरे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चंदनकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चंदनकुमार यांनी त्यांच्या दोन कार सेवा विकास बँकेसमोर रस्त्याच्या बाजूला पार्क केल्या अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री 15 लाख रुपये किमतीच्या 2 कार आणि कारमध्ये असलेली महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

  • भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ स्पाईन सिटी मॉलसमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरली. याप्रकरणी किसन नीलकंठ आनकाडे (रा. डुडुळगाव) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

बाबुराव भानुदास कडाळे (वय 34, रा. मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांचे पंधरा हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एमएच 14 / डीझेड 3522) त्यांच्या घरासमोर पार्क केली असता रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी ती चोरुन नेली.

  • चिखली पोलीस ठाण्यात श्याम भरत शिंदे (वय 25, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली त्यांची 50 हजार रुपये किमतीचे मोटारसायकल (एमएच 14 / जीआर 6940) राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली.

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तापकीर नगर काळेवाडी येथे घराच्या पार्किंग मध्ये हँडल लॉक करून ठेवलेली तीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / ईई 1083) चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत धीरज कुमार रमेश मलये (वय 23) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.