Chakan News : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज़  – चाकण येथे पतीशी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. (Chakan News) याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आले आहे.

 

आरोपी आपल्या मयत पत्नीचा वारंवार मानसिक व शारिरीक छळ करत असे.  कपडे घालणे, बांगड्या घालणे यावरून तसेच सासऱ्यांना औषधासाठी पैसे गावी पाठवण्यासारख्या किरकोळ कारणावरून वाद घालत असे अखेर सततच्या भांडणाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे.

 

Pune News : पुण्यात भारत आणि आफ्रिकी देशांच्या सैन्यदलांचा लष्करी सरावाला सुरुवात

 

रोहित सुरेश बेडगे (वय 29 रा. चाकां सौंदर्य सोसायटी) असे आरोपीचे नाव असून  प्रवीण गोविंद कोरे (वय32 रा.खरशिंग ) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीचा आरोपानुसार आरोपी रोहित ने फिर्यादीच्या बहीणीचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी चाकण पोलीसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.