Chakan : आईच्या अंत्यविधीस न आल्याने पत्नीचे टिकवाने फोडले डोके; पतीला अटक

एमपीसी न्यूज – आईच्या अंत्यविधीस न जाता घराशेजारच्या लोकांशी हसत गप्पा मारत असल्याच्या संशयातून पतीने पत्नीचे लोखंडी टिकवाने डोके फोडले. हा प्रकार रविवारी (दि. 9) सकाळी पाचच्या सुमारास भांबरेवस्ती, महाळुंगे येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

शक्तिमान मोतीराम सिरसाट (वय 30, रा. भांबरेवस्ती, महाळुंगे. मूळ रा. सावंगा बुद्रुक, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी वर्षा शक्तिमान सिरसाट (वय 35) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शक्तिमान याच्या आईचे निधन झाले. आईच्या अंत्यविधीसाठी पत्नी वर्षा गेल्या नाहीत. तसेच त्या अंत्यविधीस न जाता घराशेजारील लोकांशी हसत गप्पा मारत असल्याचा गैरसमज शक्तिमानला झाला. त्या गैरसमजातून त्याने लोखंडी टिकावाने वर्षा यांच्या कपाळावर व डोक्यात मध्यभागी मारले. यामध्ये वर्षा गंभीर जखमी झाल्या. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.