Chakan : विमानासाठीच्या वायरिंग सुविधेचे ‘जीकेएन’ एरोस्पेस तर्फे अनावरण; 70 टक्‍के महिलांना संधी देणार

एमपीसी न्यूज – चाकण येथे ‘जीकेएन एरोस्पेस कंपनी’च्या विमानासाठी ‘वायरिंग’ सुविधा पुरविणाऱ्या सुविधेचे अनावरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘कंपनी’मध्ये कर्मचारी म्हणून 70 टक्‍के महिलांना संधी देण्यात येणार आहे, असे ‘जीकेएन फोकर एल्मो’चे उपाध्यक्ष मिशेल बोरेंडसे यांनी सांगितले. हा अनावरण सोहळा सेनापती बापट रस्त्यावरील ‘जेडब्ल्यू मेरिट हॉटेल’मध्ये मंगळवारी (दि. 3 डिसेंबर) सुविधेचा अनावरण सोहळा पार पडला आहे.

यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘अन्ड्रीआन लेयटे’, ‘मार्टिन डुर्विल्लर’, विजय शहाणे आदी उपस्थित होते.

कंपनीच्या वतीने भारतात 2020 मध्ये 200 नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहे, असे ‘लेयटे’ यांनी सांगितले. ते म्हणाले, “भारतामध्ये हवाई क्षेत्रात वाढत चाललेली गुंतवणूक बघता आम्ही हा प्रकल्प येथे सुरु केला आहे. पुण्यामध्ये शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातून कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. तसेच माहिती तंत्रज्ञान तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असल्यामुळे आम्ही येथे गुंतवणूक केली आहे.”

चीननंतर भारतात हि सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याद्वारे प्रवासी विमानासाठी आवश्यक उच्च दर्जाची वायरिंग सुविधा पुरवली जाणार आहे. विशेष म्हणजे महिलांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे, असे शहाणे म्हटले.

“कंपनीच्या वतीने एक कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली असून, त्याद्वारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, आवश्यक उच्च दर्जाची यंत्रसामुग्री घेण्यात आली
आहे. भविष्यात चालक आणि अभियंत्यांसाठी ८०० नोकऱ्या आम्ही निर्माण करू, असे मिशेल बोरिंडसे, उपाध्यक्ष, जीकेएन फॉकर एल्मो म्हणाले आहेत.

या वायरिंग सुविधेची वैशिष्ट्ये म्हणजे देशातील विमान उत्पादनासाठी पूरक सुविधा, पुढील पाच वर्षात ८०० नोकऱ्यांची निर्मिती, ९२ वी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या महिलांना संधी आणि भविष्यात संरक्षण आणि विमान वाहतुकीसाठी महत्वपूर्ण सुविधा या असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.