Chakan : मशीनवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करताना अचानक मशीनवरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना चिंबळीफाटा (ता. खेड) येथील राधेशाम वेल्फर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रविवारी (दि.२६) सायंकाळी साडेसहाचे सुमारास घडली.

शुभमकर नारायण चंद्र सरकार (वय २२ वर्ष, रा.चिंबळी फाटा, चाकण, ता. खेड जि पुणे) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. चाकण पोलिसांत रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, शुभमकर नारायण चंद्र सरकार (वय २२ ) हा पुणे राधेशाम वेल्फर प्रायव्हेट लि. कंपनीत येथे काम करीत असताना अचानक मशिनवरुन खाली पडल्याने त्यास कमरेस गंभीर मार लागला.

त्यास सुरुवातीला येथील श्वास हॉस्पीटल या खासगी रुग्णालयात आणि तत्काळ पुढे पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.