Chakan : ‘डब्ल्यू.टी.ई’ कंपनीतर्फे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर, योगाचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – कामाच्या ताणतणावात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी पाणी व सांडपाणी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील नामांकित डब्ल्युटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या वतीने कर्मचा-यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली.

चाकण येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाला डब्लू. टी. ई. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. कंपनीचे दर्शना देशपांडे, स्वप्नील खोडे, सुभाष धोंडकर, राहुल कदम, सुनिल धर्माले, अतुल कोकांडे, मनीषा गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 125 कर्मचा-यांची या मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचा लाभ घेतला. कॉन्टॅक्ट केअर रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. डॉ. हरिश पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली.

त्याचबरोबर योग गुरु सुरेश साळुंके यांनी कर्मचा-यांना योगाचे धडे दिले. कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. नियमित योग केल्याने मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून तुम्ही जर प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर, पूर्ण दिवस तुम्हाला नक्कीच आनंद आणि उत्साही वाटेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.