BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

0 124
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – दोन तरुणांमध्ये पैशांच्या वादातून भांडण झाले. त्यात एकाने दुस-याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी साडेसात वाजता कर्पेवस्ती नाणेकरवाडी येथे घडली.

.

दिलू कृष्णचंद्र दलाई (वय 22, रा. कर्पेवस्ती, नाणेकरवाडी, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ईश्वर भरत साहू (वय 30, रा. कर्पेवस्ती, नाणेकरवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी दिलू आणि आरोपी ईश्वर या दोघांमध्ये पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून भांडण झाले. यामध्ये ईश्वर याने दिलू याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. यामध्ये दिलू गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: