BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या तरुणावर चाकूने वार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेले चोरटे मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेत असताना तरुणाने त्यांना प्रतिकार केला. यामुळे चोरट्यांनी तरुणाला दगडाने मारहाण करून त्याच्या पोटात चाकूने मारले. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री साडेदहाच्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावर म्हाळुंगे गावाजवळ घडली.

विशाल ज्ञानेश्वर शेवाळे (वय 21, रा. एच पी पंपाजवळ, म्हाळुंगे) या तरुणाने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोटारसायकल (एम एच 14 / बी पी 1267) वरून आलेल्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल इलेक्ट्रिशियनचे काम करतो. तो काम संपवून सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते चाकण तळेगाव रस्त्यावरून त्यांच्या भावाशी फोनवर बोलत जात होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी विशाल यांच्याकडे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने येऊन मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी विशाल यांनी प्रतिकार केला. त्यावेळी आरोपींनी विशाल यांच्या डोक्यात दगड मारला व पोटात चाकूने मारून गंभीर जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.