Chakan: दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक

Chakan: Young man arrested for molesting two minor girls आरोपीने फिर्यादी यांची मुलगी आणि फिर्यादी यांच्या नणंदेची मुलगी या दोन्ही अल्पवयीन मुलींसोबत अश्लील गैरवर्तन केले.

एमपीसी न्यूज – दोन अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. विनयभंगाची घटना दि. 21 जुलै रोजी दुपारी उघडकीस आली.

पृथ्वीराज वचिष्ठ मस्के (वय 23, रा. पवारवस्ती, कडाची वाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांची मुलगी आणि फिर्यादी यांच्या नणंदेची मुलगी या दोन्ही अल्पवयीन मुलींसोबत अश्लील गैरवर्तन केले. ही बाब मुलींनी फिर्यादी यांना सांगितली. त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 354 (अ), पोक्सो कलम 8, 12 नुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.