BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : वाहन ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून तरुणास मारहाण

648
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – वाहन ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून तरुणाला मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर घडली.

याप्रकरणी मनीष हनुमंत दौंडकर (वय 28, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार समीर शांताराम गडदे (शिवे, ता. खेड), अक्षय खुटवड, सोमा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद मनीष त्यांच्या दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रस्त्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जात होते. ते भोसे गावच्या हद्दीत आल्यानंतर आरोपी त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या वाद झाला.

यावेळी आरोपींनी मनीष यांना हाताने आणि दगडाने मारहाण केली. यामध्ये मनीष यांच्या डोक्याला तसेच नाकाला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.