Chakan : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करत तरुणीची बदनामी; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तरुणीसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड करून ‘माझी चौथी बायको’ आणि अन्य आक्षेपार्ह मजकूर लिहून तरुणीची बदनामी केली. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 31 वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. सन 2018 साली त्या दोघांनी फोटो काढले होते. त्यानंतर त्याच वर्षी दोघांनी एकमेकांसोबतचे प्रेमसंबंध तोडले. आरोपीने फेसबुक या सोशल मीडियावर नवीन अकाउंट सुरू करून त्यावर फिर्यादीचे फोटो अपलोड केले. त्यासोबत ‘माझी चौथी बायको’ आणि अन्य आक्षेपार्ह मजकूर फोटोसोबत शेअर केला.

फिर्यादी तरुणीने पुन्हा आरोपिसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करावेत, यासाठी त्याने तरुणीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केला. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.