BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : खराबवाडी मध्ये दोघांवर खुनी हल्ला एकाचा जागीच मृत्यू ; एक गंभीर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- दोन युवकांवर टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना चाकणजवळ खराबवाडी ( ता. खेड) येथे शुक्रवारी (दि.८) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. धारदार शास्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.

प्रशांत धर्मनाथ बिरदवडे ( वय १९ रा. राणूबाईमळा, चाकण) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून पियुष शंकर धाडगे ( वय १९, रा राणूबाईमळा, चाकण ) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. चाकण – तळेगाव रस्त्यावर खराबवाडी गावाच्या हद्दीत सोनालिका गृहप्रकल्पाच्या समोरील भागातून वरील दोघे जात असताना धारदार शस्त्रांसह आलेल्या टोळक्याने हा हल्ला केला.

जखमी पियुष यांच्याकडून रुग्णालयातून माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. जखमी पियुष याच्यावरही गंभीर वार झाले आहेत. हा हल्ला कोणी केला? त्यामागचे नेमके कारण काय? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नसून, पोलिसांची विविध पथके या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

HB_POST_END_FTR-A2

.