Chakan Crime : झोपताना काढून ठेवलेले 60 हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले

चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.  

एमपीसी न्यूज – झोपताना डोक्याजवळ काढून ठेवलेले 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 14) पहाटे एक वाजताच्या सुमारास मेदनकरवाडी येथे भगतवस्ती येथे घडली.

कलाबाई जगन्नाथ पंचरास (वय 60, रा. भगतवस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चार इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी कलाबाई आणि त्यांचे पती त्यांच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात झोपले होते. झोपताना कलाबाई यांनी त्यांचे 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढून डोक्याजवळ ठेवले होते. सोमवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र चोरून नेले. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.