Ind Vs Aus Test Series : भारतासमोर विजयासाठी 407 धावांचं आव्हान

एमपीसी न्यूज – भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 407 धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात 94 धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव 312 धावांवर घोषीत केला. 

सिडनी कसोटीत आज चौथ्या दिवशी त्यांनी सामन्यावर चांगली पकड मिळवली आहे. सकाळच्या सत्रात काल नाबाद राहिलेल्या मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांनी अर्धशतकं झळकावून ऑस्ट्रिलियाची धावसंख्या वाढवली. कॅमरुन ग्रीन (84), स्मिथ (81) आणि लाबुशेन (73) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सहा गड्यांच्या मोबदल्यात 312 धावा केल्या. भारताकडून सैनी आणि अश्विन यांनी 2-2 बळी घेतले. तर, सिराज आणि अश्विनला 1-1 बळी घेतला.

 

 

ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 407 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताकडून रोहित शर्मा (14) आणि शुभमन गिल (12) मैदानावर खेळत आहेत. भारताकडे चांगल्या फलंदाजांची फळी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 407 धावाचं आव्हान भारत पार करणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

पॅट कमिन्सच्या षटकात दोघांनाही जीवनदान 

रोहित शर्माला पॅट कमिन्सने एलबीडब्लू करत आऊट केले. रोहित शर्माने रिव्हिह घेतला आणि त्यात त्याला जीवनदान मिळाले. त्याच षटाकात गिल देखील यष्टीच्या मागे झेलबादसाठी ऑस्ट्रेलिया संघाने रिव्हिह घेतला त्यानंतर गिलला देखील नॉट आऊट देण्यात आले.

दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. त्यानंतरदेखील चौथ्या दिवशी सिडनीच्या मैदानातील काही चाहत्यांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केल्याने सुरू असलेला खेळ थांबवण्यात आला होता. मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी सिराजच्या तक्रारीनंतर तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून उठवण्यात आलं

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.