Pune : स्थायी समितीच्या नव्या अध्यक्षांपुढे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे आव्हान

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक हे सहा हजार कोटींच्या आसपास आहे. त्यामध्ये साधारण 1700 ते 2 हजार कोटींची तूट येते. येत्या शुक्रवारी नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यांच्या समोर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे मुख्य आव्हान आहे.

स्थायी समितीमध्ये भाजपचे 10 सदस्य आहेत. त्यामुळे याच पक्षाचा अध्यक्ष होणार असल्याचे निश्चित आहे. भाजपने अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने यांना तर राष्ट्रवादी – काँग्रेस – शिवसेना महाविकास आघाडीतर्फे अशोक कांबळे यांचा अर्ज दाखल केला आहे. नवीन अध्यक्ष लवकरच बजेटचा आढावा घेणार आहे. कारण, 17 जानेवारीच्या आसपास महापालिका आयुक्तांचे बजेट सादर होणार आहे. नोटबंदी, जीएसटी, रेरा नंतर बांधकाम क्षेत्रात अभूतपूर्व अशी मंदी आहे. महापालिकेला बांधकाम क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. तर, मिळकत करही पाहिजे त्या प्रमाणात वासूल होत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे शासनही ‘जीएसटी’चा अपेक्षित परतावा देत नाही. त्यामुळे आगामी काळात महापालिकेचे उत्पन्न वाढविणे आव्हानात्मकच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.