PimpleSaudagar : चिमुकल्यांच्या कलागुणांनी रंगले चॅलेंजर पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली.

पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक संदीप काटे, हिंजवडी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्ना देवतळे, शंकर जगताप, स्वागता मान्ना, पालक योगेश रानभरे, धैर्यशील सणस, आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी उपसंस्थापक अनिता काटे, संचालक संतोष काटे, निलेश काटे, निहारा काटे, लीना काटे यांचा विशेष सहभाग होता. यावेळी पूर्व प्राथमिक विभाग वाकड शाखेच्या मुख्याध्यापिका दीपिका येसूदास, पिंपळे सौदागर शाखेच्या मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, पूर्वप्राथमिक विभाग कोऑर्डिनेटर पलक गांधी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यानी अनेक नृत्यप्रकार सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.