Pune News : चंपा हा नावाचा शॉर्टफॉर्म त्यामुळे त्यांनी रागवू नये : जयंत पाटील

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी‌ काँग्रेस हा शरद पवारांच्या‌ विचारावर चालणारा पक्ष आहे. दुसऱ्यांचा अनादर करण्याची आमची संस्कृती नाही. आम्ही कधीही देवेंद्र फडणवीस यांना ‘टरबूज्या’ असे म्हटले नाही. चंपा हा चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफोर्म होतो. त्यामुळे त्यांनी राग‌ावू नये, अशी कोपरखळी राज्याचे‌ जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मारली.

पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील‌ यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त‌ केले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पाटील म्हणाले, गतवेळचे पदवीधर आमदार चंद्रकांत पाटील यांनी काय काम केले. कोल्हापूर वरून कोथरूडमध्ये येऊन त्यांनी काय काम केले. ते ज्या ठिकाणी जातील त्याठिकाणी प्रश्न निर्माण करतात. पुण्यात येऊन त्यांनी नेमके काय प्रश्न निर्माण केले ते मेधा कुलकर्णी यांना विचारा, असा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.

वीज बीलाच्या‌ संदर्भात पाटील म्हणाले, वीज मंडळाची 67 हजार कोटी रुपयाची थकबाकी आहे. ही थकबाकी केवळ सामान्य नागरिकांची नाही तर उद्योगीक व व्यावसायिक स्वरुपाचीही आहे. या थकबाकीमुळे सदर संस्था अडचणीत आहे. राज्य‌ सरकार संवेदनशील आहे. शेतकरी व नागरिक संकटात येईल, असे पाऊल न उचलता आम्ही योग्य तो मार्ग काढू. वीज मंडळाची थकबाकी मागच्या‌ सरकारमुळे वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.