Weather Report : महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता 

Chance of heavy rains in sparse places in Maharashtra.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच, कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. 

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेत्रेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण व गोवाः सावंतवाडी 1

मध्य महाराष्ट्र: भोर 7, इंदापूर, खेड राजगुरूनगर 5 प्रत्येकी, दहिवडी माण, कराड, पन्हाळा, शिराळा 3 प्रत्येकी, बारामती, खटाव वडूज, श्रीगोंदा 2, आंबेगाव घोडेगाव,
कर्जत, सातारा, विटा 1 प्रत्येकी

मराठवाडा: पैठण 2

पुढील हवामानाचा अंदाज:

25 ऑक्टोबर: मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोंकण गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता . विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

26 ऑक्टोबर: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता

27-28 ऑक्टोबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

इशारा:

25 ऑक्टोबर: मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

26 ऑक्टोबर: कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

27-28 ऑक्टोबर: काही नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.