Weather upadate : आज देखील पावसाची शक्यता, 6 जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट

एमपीसी न्यूज : राज्यात मंगळवार,बुधवारी औरंगाबाद, अहमदनगर, वाशिम, अकोला, बुलडाणा,नागपूर, चंद्रपूर, नांदेडमध्ये पावसानं हजेरी लावली. अकोल्यात अचानक आलेल्या जोरदार वारा आणि पाउस व गारपीटमुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीठ देखील झाली. शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून आज देखील पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. आयएमडीनं विदर्भातील 6 जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.

 

नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो, असं सांगण्यात आलंय. उस्मानाबादमध्ये 29, 30 डिसेंबरला पावसाचा अंदाज आहे.

राज्यात मंगळवारी औरंगाबाद, अहमदनगर, वाशिम, अकोला, बुलडाणा,नागपूर, चंद्रपूर, नांदेडमध्ये पावसानं हजेरी लावली.अकोल्यात अचानक आलेल्या जोरदार वारा आणि पाउस व गारपीटमुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.

दरम्यान, राज्यात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा काही प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे रात्री हलका गारवा जाणवतो आहे. पावसाळी स्थितीत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.