Weather Report : कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्‍यता.

Chance of rain with thunder and lightning in sparse places in Konkan-Goa and Central Maharashtra.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. 

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: सावंतवाडी 5, लांजा, माणगाव 4 प्रत्येकी, डहाणू, खालापूर, मुंबई (कुलाबा), तलासरी 3 प्रत्येकी, कानकोन, चिपळूण, कणकवली, कुडाळ, मोखेडा 2 प्रत्येकी, देवगड, पेडणे, राजापूर, रत्नागिरी, संगमेशवर देवरूख 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: सुरगणा 6, पुणे, सांगली, शिरोळा 5 प्रत्येक, आजारा, हर्सूल, कवठे महाकाळ, ओझरखेडा, शिराळा 4 प्रत्येकी, जामनेर, मिरज, पलूस, पन्हाळा, पारनेर, संगमनेर, शाहूवाडी, श्रीरामपूर, तासगाव 3 प्रत्येकी, चांदगड, गगनबावडा, हातकणंगले, जळगाव, कागल्र, पुरंदर, सासवड, रहाता, राहुरी, वाळवा इस्लामपूर 2 प्रत्येकी, अकोले, भुसावळ, जाट, कराड, कोल्हापूर, मुळदे, राधानगरी, शेवगाव, सिन्नर, त्र्यंबकेश्वर 1 प्रत्येकी.

मराठवाडा: गंगापूर 6, खुल्दाबाद, वैजापूर 1 प्रत्येकी.

विदर्भ: सिरोंचा 2, अकोट, तेल्हारा 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

22 ऑक्टोबर: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

23 ऑक्टोबर: कोंकण गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

24-25 ऑक्टोबर: कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

इशारा:

22-23 ऑक्टोबर: कोंकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता.

24-25 ऑक्टोबर: काही नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.