_MPC_DIR_MPU_III

Weather Report : पुण्यात मेघगर्जनेसह मध्यम तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी ‘मुसळधारे’ची शक्‍यता

Chance of thunderstorm in Pune and thunderstorms in Marathwada, Central Maharashtra and Vidarbha

एमपीसी न्यूज – राज्यात मान्सूनच्या पावसाने जोर धरला असून काही ठिकाणी मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पुण्यात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची अंदाज पुणे हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

गेल्या 24 तासांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच, कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊसाची नोंद झाली आहे.

 

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे

कोकण आणि गोवा : कानाकोना 13, मार्मगोवा, रामेश्वर कृषी 7 प्रत्येकी, देवगड, मालवण 6 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा) 5, राजापूर, सावंतवाडी, सुधागड पाली, वल्पोई 4 प्रत्येकी, चिपळूण, दोडामार्ग, हरनाई, कुडाळ, लांजा, मडगाव, केपे, संगमेश्वर देवरुख, सांगे, शहापूर 3 प्रत्येकी, गुहागर, जव्हार, कणकवली, खेड, पेडणे, पोलादपूर, विक्रमगड 2 प्रत्येकी, अलिबाग, कल्याण, खालापूर, म्हापसा, माथेरान, मोखेडा, मुंबई (सांताक्रूझ), मुरबाड, मुरुड 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : शिरूर घोडनाडी 12, महाबळेश्वर, पारोळा 4 प्रत्येकी, जेऊर, मिरज 3 प्रत्येकी, गगनबावडा, हातकणंगले, इगतपुरी, नांदगाव, तासगाव 2 प्रत्येकी, भोर, गिरना धरण, हर्सूल, जुन्नर, कोरेगाव, पन्हाळा, शाहुवाडी, सिन्नर, वडगाव 1 प्रत्येकी.

मराठवाडा : परभणी 11, पूर्णा 8, धर्माबाद 7, उमरी 6, पालम, रेणापूर, सोनपेठ 5 प्रत्येकी, औंधा नागनाथ, हिमायतनगर, नायगाव खैरगाव 4 प्रत्येकी , अंबेजोगाई, मानवत 3 प्रत्येकी , अंबड, अर्धापूर, बिल्लोली, कंधार, माजल गाव, परळी वैजनाथ , पाथरी, सेलू, शिरूर कासार, वैजापूर 2 प्रत्येकी, चाकूर, गंगाखेड, घनसावंगी, जिंतूर, कैज, लातूर, लोहा, मुदखेड, नांदेड 1 प्रत्येकी.

विदर्भ : नांदगाव काजी 9 प्रत्येकी, दर्यापूर 6, कामठी, नागपूर 5 प्रत्येकी, आष्टी, चांदूर बाजार, कुही, पारशिवनी 4 प्रत्येकी, अमरावती, आर्वी, बटकुली, भंडारा, देवळी, गोंड पिपरी, गोरेगाव, हिंगणा, कळंब, कळमेश्वर, काटोल, खरंगा, मोदा, मोर्सी, सेलू 3 प्रत्येकी, अकोट, अंजनगाव, भामरागड, धामणगाव, जळगाव जामोद, कारंजा लाड, कोरपना, कुरखेडा, लाखनी, मोहाडी, नारखेडा, परतवाडा, सालेकसा, समुद्रपूर, संग्रामपूर, सावनेर, तेल्हारा, तिवसा, वर्धा, वरुड 2 प्रत्येकी ,आमगाव, आर्मोरी, बाभुळगाव, बाळापूर, चांदूर, कोरची, राजुरा, रामटेक, तुमसर, उमरेड 1 प्रत्येकी.

घाटमाथा : शिरगाव, अम्बोणे 1 प्रत्येकी, डुंगगवाडी 2, कोयना (नवजा) 1, ताम्हिणी 3

_MPC_DIR_MPU_II

* पुढील हवामानाचा अंदाज

1 – 2 जुलै : कोंकण गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

3 – 4 जुलै : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

5 जुलै : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

* इशारा

1 -2 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

3- 4 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची

तसेच पुण्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.