Weather Report : कोकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्‍यता

Chance of torrential rain in sparse places in Konkan-Goa and Central Maharashtra.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : तलासरी 9, मुळदे 4, अंबरनाथ, भिवंडी, दोडा मार्ग, जव्हार, खेड, कुडाळ, लांजा, मंडणगड, माथेरान, पणजी (गोवा), सावंतवाडी, शहापूर, उल्हासनगर 3 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), कणकवली, म्हापसा, मोखेडा, पोलादपूर, केपे, रामेश्वर कृषी, रोहा, सुधागड पाली, वाल्पोई, वसई, विक्रमगड 2 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), चिपळूण, हरनाई, कल्याण, कर्जत, खालापूर, मालवण, मार्मागोवा, म्हसळा, मुंबई(सांताक्रूझ) मुरबाड, पालघर, पनवेल, पेण, पेडणे, फोंडा, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर देवरुख, सांगे, ठाणे, वैभववाडी, वेंगुर्ला, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : अक्कलकुवा 7, गगनबावडा, इगतपुरी 5 प्रत्येकी, आजारा, हर्सूल, महाबळेश्वर, पेठ, राधानगरी, शाहूवाडी, सुरगाणा, तळोदा 3 प्रत्येकी, लोणावळा (कृषी), मुळदे, पन्हाळा, पौड, मुळशी, त्र्यंबकेश्वर, वेल्हे 2 प्रत्येकी, अकोले, भोर, चांदगड, गडहिंग्लज, भुदरगड, जाट, जावली मेधा, नवापूर, ओझरखेडा, पाटण, शहादा, शिराळा, शिरोळ, श्री गोंदा, तासगाव 1 प्रत्येकी.

मराठवाडा : रेणापूर 2, भूम, मुदखेड, शिरूर अनंतपालर, वाशी 1 प्रत्येकी.

विदर्भ : अंजनगाव, धरणी, गोंदिया, मोर्सी, तेल्हारा 1 प्रत्येकी

घाटमाथा : ताम्हिणी 11, कोयना (नवजा) 8, शिरगाव 7, अम्बोणे, दावडी 6 प्रत्येका, कोयना(पोफळी), डोंगरवाडी 4 प्रत्येकी , खंद , खोपोली 3 प्रत्येको, वळवण, ठाक्रवाडी, शिरोटा, लोणावळा(टाटा), लोणावळा(ऑफिस), भिवपुरी, वाणगाव 2 प्रत्येकी,

पुढील हवामानाचा अंदाज:

25 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

26 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

27 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

28 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

25 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

26-27 ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

28 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.