Weather Report : कोकण – गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्‍यता

Chances of heavy rain in sparse places in Kokan-Goa and Vidarbha.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच, गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: विदर्भात जोरदार तर कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : सांगे 9, केप 8, कॅनाकोना 6, लांजा, माथेरान, वाल्पोई 4 प्रत्येकी, दोडा मार्ग, कुडाळ, महाड, म्हापसा, पेडणे 3 प्रत्येकी, कणकवली, खेड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, राजापूर, संगमेश्वर देवरुख 2 प्रत्येकी, चिपळूण, देवगड, गुहागर, हर्णे, कल्याण, खालापूर, मालवण, मार्मगोवा, मुरुड, पणजी (गोवा), श्रीवर्धन, सुधागड पाली, वैभववाडी, वेंगुर्ला, वडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 5, गगनबावडा, नवापूर, राधानगरी 3 प्रत्येकी, धाडगाव, गाडिहिंग्लज, लोणावाळा (कृषी) 2 प्रत्येकी, भडगाव, चांदगड, नंदुरबार, पन्हाळा, शहादा, शाहुवाडी, शिराळा 1 प्रत्येकी.

मराठवाडा : बिलोली 6, धर्मबाद, सोयगाव 5 प्रत्येकी, हदगाव, हिमायतनगर, किनवट, नायगाव खैरगाव 3 प्रत्येकी, औंढा नागनाथ , हिंगोली, जाफराबाद, जळकोट, मुखेड, उमारी 2 प्रत्येकी , अहमदपूर, अर्धापूर, भोकरदन, देगलूर, माहूर, मुदखेड, परभणी, सेनगाव सिल्लोड 1 प्रत्येकी.

विदर्भ : गोंदिया, 15, गोरेगाव, साकोली 11 प्रत्येकी, सडक अर्जुनी, तुमसर 10 प्रत्येकी, लाखनी, मोहाडी 9 प्रत्येकी, कुरखेडा ७, अर्जुनी मोरगाव, भामरागड, देवरी, तिरोरा 6 प्रत्येकी , भंडारा, चांदूर, मौदा 5 प्रत्येकी, कोरची, लाखंडदूर, पारशिवनी 4 प्रत्येकी , अहिरी, आमगाव, बल्लारपूर, चंद्रपूर, देसाईगंज, कंप्ती, कुही, पोनी, रामटेक, सावनर, सेलू, शिंदेवाहि 3 प्रत्येकी, अमरावती, आर्मोरी, आष्टी, भिवापूर, ब्रहमपुरी, चिखलदरा, चिमूर, धानोरा, एटापल्ली, खारागंगा, उमरेड 2 प्रत्येकी, आर्वी, बाटकुली, भद्रावती, चामोर्शी, देवळी, गोंड पिपरी, हिंगणघाट, हिंगणा, जिवती, कळमेश्वर, काटोल, कोरपना, मूल, नागभिर, नांदगाव काजी, राजुरा, रिसोड, सालेकसा, समुद्रपूर, साओली, सिरोंचा, वर्धा, वरोरा, वाशिम १ प्रत्येकी.

घाटमाथा : ताम्हिणी 12, शिरगाव, दावडी, डोंगरवाडी 6 प्रत्येकी, अम्बोणे, वळवण 4 प्रत्येकी, लोणावळा(ऑफिस), लोणावळा(टाटा), खंद, खोपोली कोयना(नवजा), कोयना(पोफळी) 2 प्रत्येकी, वाणगाव भिवपुरी, शिरोटा 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

11 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

12 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

13 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

14 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

इशारा :

11 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

11-13 ऑगस्ट : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

14 ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.