Chandan Nagar Crime : मैत्रिणीसोबत बोलल्याने दुसऱ्या मित्राने केला हल्ला

एमपीसी न्यूज : माझ्या मैत्रिणीसोबत बोलू नकोस (Chandan Nagar Crime) असे सांगूनसुद्धा तू माझ्या मैत्रिणी सोबत का बोलतोस? या कारणावरून दोन मित्रात भांडण झाले. यातील एकाने दुसऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आयटी पार्क जवळ 7 ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला.

या घटनेत गणेश लाला गंगावणे (वय 18) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गोप्या उर्फ विकास प्रभाकर गायकवाड (वय 20) आणि सूर्यकांत बाप्पा गायकवाड (वय 28) या दोघांना अटक केली आहे.

Bhosri Crime : महिला दुकानदाराला मारहाण करणारा तथाकथित भाई गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश गंगावणे आणि आरोपी गोप्या गायकवाड हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने फिर्यादीला झेन्सार आयटी पार्क जवळील मोकळ्या मैदानात रविवारी रात्री बोलावले होते. यावेळी त्याला माझ्या मैत्रिणी सोबत बोलू नकोस असे सांगून सुद्धा तू त्यांच्याशी का बोलतोस असे विचारले. याचवेळी आरोपी सोबत असलेल्या दुसऱ्या एकाने फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. तर, फिर्यादी सोबत असलेल्या त्यांच्या मित्राला देखील लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेत दोघेही गंभीर (Chandan Nagar Crime) जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंदन नगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.