Chandni Chowk Bridge : 30 वर्षांपूर्वी बांधलेल्या चांदणी चौक पुलाचे सुरू झाले काऊंटडाऊन!

एमपीसी न्यूज – सुमारे 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला चांदणी चौक पूल (Chandni Chowk Bridge) पाडण्याची तयारी पूर्ण झाली असून काही तासांतच हा पूल इतिहासजमा होणार आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा पूल पाडण्यात येणार असून त्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

हा पूल नियंत्रित स्फोट घडवून पाडण्यात येणार असून त्यासाठी तब्बल 600 किलो स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. ही स्फोटके भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्फोटामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. परिसरातील इमारती देखील खाली करण्यात आल्या आहेत.

हा स्फोट होईल तेव्हा उडणारा धुराळा खाली बसण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी लागेल, असे सांगण्यात येत आहे. पूल पडल्यानंतर निर्माण होणारा राडारोडा हलविल्यासाठी जेसीबी व डंपर सज्ज ठेवण्यात आले आहेत. हा राडारोडा बाजूला करण्यासाठी किमान सहा तासांचा कालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Pune chandani chowk : 1300 छिद्र, शेकडो किलो स्फोटकं, चांदणी चौकातील जुना पूल पडण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

चौकातून होणारी वाहतूक (Chandni Chowk Bridge) पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली असून रात्री दहा नंतर या भागातील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पूलाजवळील प्रत्येक हालचालींवर पोलीस बारकाई नजर ठेवून आहेत.

5G Internet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण

हा पूल (Chandni Chowk Bridge) पाडण्याबाबत माध्यमांमधून होत असलेल्या बातम्यांच्या भडीमारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून हा पूल पडताना पाहण्यासाठी बघ्यांची आज दिवसभर गर्दी होती. पोलिसांच्या नजरा चुकवून लोक पुलाच्या परिसरात घुसत होते. फोटो-व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करताना दिसत होते. या अतिउत्साही बघ्यांची गर्दी नियंत्रित करणे पोलिसांसाठी डोकेदुखीचा विषय बनल्याचे पहायला मिळत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.