Chandannagar Crime News : चंदननगरमधून सराईत चोरटा जेरबंद, दोन पिस्तुलांसह 10 काडतुसे जप्त

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी दरोडा, चोरी, जबरी चोरी करणा-या सराईताला चंदननगर पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, 10 काडतुसे आणि मोटार मिळून 3 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सुग्रीव अंकुश भंडलकर, असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस ठाण्यातंर्गत एका महिलेच्या तक्रारीनुसार पोलिस तपास करीत असताना तिच्या पतीकडे पिस्तूलासह सहा काडतुसे मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली. चौकशीत त्याने बारामतीतील खांडज गावातील सुग्रीव भंडलकर याच्याकडून 40 हजारांना पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुग्रीवला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बारामती शहर, बारामती तालुका, भिगवण, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, दरोडा घातल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून 2 पिस्तूल 10 काडतुसे जप्त करण्यात आली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.