Chandni Chowk Update: चांदणी चौकातील वाहतूक अखेर 11 तासांनी सुरळीत

एमपीसी न्यूज – पुण्याच्या चांदणी चौकात (Chandni Chowk Update) काल मध्यरात्री पाडण्यात आलेल्या जुन्या पुलाचा राडारोडा हटविण्यात आल्यानंतर तब्बल 11 तासांनी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

मुंबई-बंगलोर महामार्गावरील बावधन परिसरात असलेला चांदणी चौकातील पूल (Chandni Chowk Update) अखेर शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आला. मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी 600 स्फोटकांद्वारे या ठिकाणी मोठा स्फोट करून पूल पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या स्फोटानेही संपूर्ण पूल पडला नव्हता. त्यानंतर जेसीबी मशीन पोकलेन मशीनच्या सहाय्याने मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास संपूर्ण पूल जमीनदोस्त करण्यात आला.

सकाळी साडेदहा नंतर या ठिकाणचा संपूर्ण राडाराडा हटवण्यात आला असून आता वाहतुकीसाठी मुंबई बंगलोर महामार्ग अखेर खुला करण्यात आला.

रात्री अकरा वाजता चांगली चौकातून जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व काही सुरळीत होईल, पुलाचा पडलेला राडाराडा हटवला जाईल अशी अपेक्षा होती. सकाळी आठ वाजता वाहतूक सुरू केली जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं.

Chandni Chowk Bridge Blast

मात्र येथील वाहतूक सुरू करण्यासाठी काहीसा वेळ लागला. हा पुल अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत असल्याने पुल पाडण्यास उशीर झाला. त्यामुळे सकाळी 8 वाजल्यानंतरही राडारोडा उचलण्याचे काम सुरुच होते.

चांदणी चौकातील हा पूल 1992 साली बांधण्यात आला होता. या पुलासाठी वापरलेल्या स्टीलचे प्रमाण अधिक असल्याचे रात्रीच्या स्फोटात पुल फक्त खिळखिळा झाला. पुलाचे बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात स्टिल व दगड वापरण्यात आले होते. त्यामुळे पुल कमकुवत झाला़ तरी पिलर पडले नाही.

Chandni Chowk Bridge Blast : स्फोटानंतर पोकलेनच्या मदतीने जमीनदोस्त केला चांदणी चौकातील पूल, सकाळपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद

त्यानंतर पुलाचा राडारोडा बाजूला करण्यासाठी 30 टिप्पर, 2 ड्रिलिंग मशीन, 16 एक्स्कॅव्हेअर, 4 डोझर, 4 जे सी बी यांच्या सहाय्याने संपूर्ण रात्रभर हा राडारोडा काढण्याचे काम सुरु होते. आता मात्र हा संपूर्ण राडाराडा हटवण्यात यश आलं असून चांदणी चौकातील (Chandni Chowk Update) दोन्ही बाजूचा रस्ता आता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.