Pune : कोथरूडकरांसाठी चंद्रकांतदादांचा ‘ई गव्हर्नन्स’

एमपीसी न्यूज – कोथरूड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूडकरांना घरबसल्या आपल्याशी, कार्यालयाशी संवाद साधण्यासाठी ‘ई ऑफिस चंद्रकांतदादा पाटील’ या मोबाईल एपची निर्मिती केली आहे. गुगल प्ले स्टोर वरून हे अप्लिकेशन डाऊनलोड करून दादा पाटील यांच्या संपर्कात राहता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी कामकाजाची माहिती मिळण्यासाठी, सामान्य नागरिकांना आपल्याशी संपर्कात राहण्यासाठी सरकारी कामात पारदर्शकता आणण्यासाठी अशा प्रकारच्या ‘ई गव्हर्नन्स’चा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ‘आपले सरकार’च्या माध्यमातून राज्यातील कोट्यवधी सामान्य नागरिकांना याच माध्यमातून पारदर्शक कारभाराची अनुभूती दिली आहे. कोथरूड विधानसभेतील बहुतांश मतदार या माध्यमांचा वापर करत असल्यामुळे नागरिकांना या मोबाईल अपचा आपल्या दैनंदिन कामकाजासाठी, समस्यांसाठी, दादा पाटील यांना निवेदन, निमंत्रण, सूचना पाठविण्यासाठी उपयोग होऊ शकणार आहे.

या अप्लिकेशनमध्ये माझ्या विषयी, संवाद- ब्लॉग, कोथरूड संकल्प, निवेदन-समस्या-निमंत्रण, कार्य अहवाल, संपर्क, वृत्तपत्र लेखणीतून, छायाचित्रे- व्हिडीओ, नेहमी विचारले जाणारे प्रश्न इत्यादी माहितीचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी/ मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.