Chandrakant Patil : सर्वसामान्याला केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत  पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्या.

पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (शनिवारी) झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहूल कूल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे, जामसिंग गिरासे, मिलिंद टोणपे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा प्रत्येक महिन्यात घेण्यात यावा, असे सांगून पालकमंत्री पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, केंद्राच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव गतीने तयार करणे, मंजुरीसाठी पाठवणे तसेच त्यांचा केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी. केंद्र तसेच राज्याच्या अधिकाधिक योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत.

RSS Vijaya Dashami : रा. स्व. संघातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 16 ठिकाणी विजयादशमी उत्सव

यावेळी पालकमंत्री पाटील (Chandrakant Patil) यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांद्वारे राबवण्यात येत असलेल्या योजना व कामांची सविस्तर माहिती घेतली. अंगणवाडी बांधकाम, रस्ते, शाळा सुधार योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदींसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असे सांगतानाच जनतेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी प्राधान्याने निधीची तरतूद ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.