Pune : 14 लाखांची लोकसंख्या 70 लाख कधी झाली, कळलेच नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – पुण्याची एकेकाळी 14 लाख लोकसंख्या होती, ती 70 लाख कधी झाली कळलेच नाही. आजपर्यंत कोणत्याही सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. दिले ते कोर्टात टिकले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण दिले.

सर्वोच्च न्यायालयातही स्थगित झाले नाही. 13 टक्के आधाराच्या नोकरीत आरक्षण मिळत आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे काम सुरू आहे. हाय कोर्टात हे प्रकरण आहे. 370 कलम वर बोलणे चुकीचे काय, त्यावर 3 मिनिटेच बोलतो. 37 मिनिटे मुख्यमंत्री विकासावर बोलतात. राज ठाकरे हे शरद पवारांच्याच लाईनवर बोलतात. अजित पवारांनी मला चंपा म्हटले तर राज यांनी वेगळे बोलायला हवे ना. महाराष्ट्रात 220 जागा मिळणारच असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. मी बाहेरचा आहे म्हणजे काय पाकिस्तानचा असल्याचा आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महायुतीला 230 जागा मिळणार – विजय शिवतारे

_MPC_DIR_MPU_II

सर्वसामान्य माणसाला मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेतले. त्याला राज्यानेही साथ दिली. त्यामुळे शिवसेना – भाजप महायुतीला 230 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा विश्वास जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. 370 रद्द करून देश एकसंघ केला.

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र मान्य – प्रकाश जावडेकर

देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे समीकरण मान्य झाले आहे. 370 च्या बाजूने काँग्रेसने मत दिले. पण, विरोधात बोलत आहे. जीएसटी ही काँग्रेसनेच लागू केली. बाहेर गब्बर सिंग म्हणतात. यांना 14 वर्षे सत्तेपासून दूर ठेवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.