_MPC_DIR_MPU_III

Pune : चंद्रकांत पाटील यांच्या पराभवासाठी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँगेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा ; एमपीसी न्यूजचा अंदाज खरा ठरला

एमपीसी न्यूज – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरूड मतदारसंघात पराभव करण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीने आज मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे सविस्तर वृत्त गुरुवारी एमपीसी न्यूजने दिले होते, ते शुक्रवारी खरे ठरले.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

पाटील यांनी कधीही जनतेतून निवडणूक लढविली नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. पाटील यांचा पराभव करण्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच लक्ष घातल्याची चर्चा आहे. पाटील यांच्या विरोधात कोथरूडमध्ये प्रचंड नाराजी आहे. मध्यंतरी चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत अजित पवार यांचा पराभव करणार असल्याचे वक्तव्य केले होते. ते राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागले.

आगामी काळात पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याची सूत्रे असणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पाटील यांना कोथरूडमध्येच अडकवून ठेवण्याची राष्ट्रवादीची रणनीती आहे. पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्यासाठी कोथरूडमधून म्हणावा तेवढा विजय सोपा नाही. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे अखेरच्या क्षणी दिल्लीतून तिकीट कापण्यात आल्याची कुजबुज सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.