Pune : राज्याच्या राजकारणाची थट्टा – चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीचा समाचार

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकारचे खाती अजून ठरत नाही. तरीही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चांगले वातावरण असल्याचे सांगत आहे. गृहमंत्रीपद कोणी घ्यायला तयार नसेल तर ते शिवसेनेला द्यावे, असे सांगून पाटील यांनी, या सरकारमधील पक्षांतील भांडणे, मतभेद, निर्णय न होणे हे सर्व काही राज्याच्या राजकारणाची क्रूर थट्टा त्यांनी चालवली आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला.

पुणे महापालिकेत शुक्रवारी पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील समस्या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे यावेळी उपस्थित होते.

भाजपला हरविण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते यातच आम्हाला आनंद असल्याचे सांगितले. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या सेवा दलाने वितरित केलेल्या पुस्तिकेत सावरकरांविषयी जे विकृत लिखाण केले आहे. त्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तीव्र शब्दात निषेध करीत असून, याचा प्रत्येक जिल्ह्यात भाजपने निषेध करावा, असे आवाहन पाटील यांनी केले़. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसकडून होणारा सावरकरांचा अपमान किती सहन करणार, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.