Pune : शेखर गायकवाड यांच्याशी चंद्रकांत पाटील यांची चर्चा

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बुधवारी कोथरूड विधानसभा मतदार संघातील विविध विषयांवर भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे डीपी रोड होत नाही. ज्या प्रमाणे घरे शिफ्ट केल्यावर त्यांना फ्लॅट देता, पण दुकानदारांना काहीच देत नाही. कल्याण महापालिका दुकानदारांना दुकान देते, हीच पॉलिसी पुणे महापालिकेनेही राबवावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

विमानतळ परिसरात पुणे महापालिकेला विकासकामे करताना अनेक अडचणी येत आहेत. संरक्षण विभाग नाहरकत प्रमाणपत्र देत नाही. जवळपास 50 मोठे प्रकल्प रखडले आहेत. त्याची पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना माहिती दिली असता, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा करणार आहे. उंच बांधकामे करताना अडचण येत असल्याचे आज सकाळी मला जाणवल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.