Pune : अखेर चंद्रकांत पाटील जनतेतून निवडून आले

एमपीसी न्यूज – तुम्ही जनतेमधून निवडून येऊन दाखवा, तुम्ही लोकनेते नाही, अशी वारंवार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर करीत असत. पाटील यांचा पराभव करण्यासाठी पवार यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेश दिले होते. पाटील यांना कोथरूडकारांनी आज साथ दिली. पाटील हे तब्बल 25 हजार मतांनी विजयी झाले.

मनसेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी – काँगेसची साथ होती. पाटील यांनी एकतर्फी विजय मिळविला. त्यांनी कोथरूडमध्ये शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शाम देशपांडे यांना प्रचारात एकत्र केले. शिवाय आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचीही नाराजी दूर केली.

त्यामुळे पाटील आता खऱ्या अर्थाने जनतेतून निवडून आल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांना वारंवार सांगावे लागत होते की मी पुण्याचा जावई आहे, या विजयाने ते खरे पुणेकरही झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.